ध्रुव फाऊंडेशन आपले स्वागत करीत आहे
“स्पर्धा” हा आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेला आहे. त्यामुळेच आताच्या काळात विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षा होऊ लागल्या आहेत. त्याचे परिणामस्वरूप कुठल्याही क्षेत्रात आदर्श आणि उच्च क्षमतेचा उमेदवार मिळणे शक्य झाले आहे.
अशा परिक्षा दिवसेंदिवस निश्चितच अवघड होऊ लागल्या आहेत. अर्थातच त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी योग्य ती शिस्त व अचूक मार्गदर्शनाची गरजही वाढली आहे. त्यामुळे त्याच्यावरील खर्चाचे आकडेही खूपच अवाढव्य होऊन गेले आहेत.
यातीलच एक राज्यसेवा स्पर्धा परीक्षा. या परिक्षेत योग्य पध्दतीने अभ्यास करून लवकरात लवकर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी “ध्रुव फाऊंडेशन” घेऊन आले आहे अतिशय किफायतशीर आणि नेमका अभ्यासक्रम तोही अत्यल्प दरात..
आमची वैशिष्टये
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आम्ही परिश्रमाची पराकाष्टा केली आणि जे तुम्हापर्यंत पोचवायचे ते अप्रतिम व अत्युत्तमच द्यायचे या दृष्टीने हा अभ्यासक्रमाचा एक नवा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात सर्वांसाठी सादर केला. ज्याची अल्पावधीतच खूप चर्चा झाली आणि अढळताऱ्याप्रमाणे ध्रुवने तयार केलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पहिल्यांदाच पसंतीस उतरला.
ध्रुव फाऊंडेशनचे असे आहे अभ्यासक्रम तंत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पॅटर्न जो आहे, त्याप्रमाणे अभ्यासातील सर्व घटकांवरील संपूर्ण संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे आगळेवेगळे Video Lectures.
Digital नोटसच्या स्वरूपामध्ये सर्व घटकावरील परिपूर्ण साहित्य.
संपूर्ण अभ्यासक्रम 200 तासांचा. (परिक्षेच्या स्वरुपानुसार तासांचा कालावधी कमी जास्त असू शकतो.)
विविध परिक्षांमधील सर्व अभ्यासक्रम संकल्पनांसह समजावून सांगण्यात आल्याने विदयार्थ्यांचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होण्याची निश्चिती….
अभ्यासक्रमाचे स्वरुप
ध्रुव फाऊंडेशनने तयार केलेले Video Lectures हे मोबाईलमधील मेमरी कार्डच्या तसेच व पेन ड्राईव्ह च्या रूपामध्ये उपलब्ध आहेत. याखेरीज यामध्ये जोडल्या जाणाऱ्या विदयार्थ्यांना प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटकावर स्वतंत्र व परिपूर्ण मार्गदर्शन तज्ञांमार्फत होणार आहे. प्रत्येक घटकाची तयारी करून घेताना विदयार्थ्यांना प्रत्येक घटकावरील सर्व संकल्पना सहजपणे समजतील अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये या संकल्पना विदयार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटकाची विदयार्थ्यांना पुन्हा पुन्हा पाहून व ऐकून तयारी करता येईल. प्रत्येक विषयाची चालू घडामोडींची माहिती अपडेट मिळावी यासाठी दर आठवडयास विदयार्थ्यांच्या whatsapp अथवा email वर सर्व अदयावत घटनांविषयीची माहिती मिळणार….
तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी
ध्रुव फाऊंडेशन चा आगळा वेगळा उपक्रम
नमुना लेक्चर्स
उपलब्ध डिजीटल Video Lecturs
राज्यसेवा परीक्षा : पूर्व परीक्षा पेपर 1 व 2 सर्व विषय.
PSI परीक्षा : पूर्व परीक्षा संपूर्ण. मुख्य परीक्षा मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण.
STI परीक्षा : पूर्व परीक्षा संपूर्ण. मुख्य परीक्षा मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण.
ASO परीक्षा : पूर्व परीक्षा संपूर्ण. मुख्य परीक्षा मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण.
Tax Asst परीक्षा : मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण, बुध्दीमापन चाचणी व अंकगणित.
तलाठी परीक्षा : मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण, बुध्दीमापन चाचणी व अंकगणित.
क्लेरिकल परीक्षा : मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण, बुध्दीमापन चाचणी व अंकगणित.

