आमच्या विषयी

“स्पर्धा” हा आजच्या जीवनाचा अविभाज्य  घटक बनून गेला आहे. त्यामुळेच आताच्या काळात विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षा होऊ लागल्या आहेत. त्याचे परिणामस्वरूप कुठल्याही क्षेत्रात आदर्श आणि उच्च क्षमतेचा उमेदवार मिळणे शक्य झाले आहे.

अशा परिक्षा दिवसेंदिवस निश्चितच अवघड होऊ लागल्या आहेत. अर्थातच त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी योग्य ती शिस्त व अचूक मार्गदर्शनाची गरजही वाढली आहे. त्यामुळे त्याच्यावरील खर्चाचे आकडेही खूपच अवाढव्य होऊन गेले आहेत.

यातीलच एक राज्यसेवा स्पर्धा परीक्षा. या परिक्षेत योग्य पध्दतीने अभ्यास करून लवकरात लवकर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी “ध्रुव फाऊंडेशन” घेऊन आले आहे अतिशय किफायतशीर आणि नेमका अभ्यासक्रम तोही अत्यल्प दरात..

ही तर आयुष्य घडविणारी स्पर्धा

आज स्पर्धा परीक्षांकरीता राज्यभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्नपूर्वक कष्ट करीत आहेत. यातही अभ्यासाची दिशा निश्चित करणारे व तशा दिशेने प्रयत्न करणारे विद्यार्थी कमी वेळेत यशाचे शिखर गाठतात. तर काही विद्यार्थी `अटेम्ट` च्या रांगेत ५ ते १० वर्षापर्यंत प्रयत्न करतात. याखेरीजही असे कित्येक विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक बाबींमुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. शिवाय काही विद्यार्थी असेही आहेत, ज्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे, मात्र सद्यस्थितीत काही अपरिहार्य जबाबदाऱ्या आहेत, म्हणून परगावी, शहरांत जाऊन अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाहीत. अर्थात आपल्या मुलाने, किंवा मुलीने गावातच राहून दर्जेदार अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये बाहेर जाऊन अभ्यास करायची म्हणजे ५० हजार ते १ लाखापर्यंत खर्च करायची ऐपत नसते. दरमहा अगदी पाच ते दहा हजारांचा खर्च करणेही अनेक कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे स्वप्ने तर पाहिली जातात, मात्र ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी असे अडथळे येत राहतात.

0
+
Students benefited
0
+
Video Lectures
0
Subjects

संकल्पनेचे प्रवर्तक

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आजच्या अपेक्षा व सामाजिक बांधिलकीची गरज समजून राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या गुणात्मक विकासासाठी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी श्री. कुंडलिक कारकर व ध्रुव फाऊंडेशनचे संचालक सुहास कोकाटे हे यामध्ये सहभागी आहेत. अर्थात काही चांगले करण्याची तळमळ असलेले व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान, विपणन क्षेत्रातील तरूण व काही निवृत्त प्रशासकीय अधिकारी तसेच  अनुभवी तज्ज्ञ, विविध विषयांमधील तज्ञ, गणित तज्ज्ञ, व काही जागरूक पालक वर्ग हे देखील ध्रुव फाऊंडेशन चे संस्थापक सदस्य आहेत.

या क्षेत्रात ध्रुव फाऊंडेशनने प्रवेश का केला?

महाराष्ट्रातील राज्य लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत सखोल अभ्यास केल्यानंतर तसेच विदयार्थ्यांना अभ्यास करताना येणा-या नेमक्या अडचणी विदयार्थ्यांच्या अभ्यास पध्दतीतील गुणदोषांची, त्रुटींची प्रकर्षाने जाणीव झाल्यानंतर या त्रुटी कशा रीतीने दूर करता येतील, यावर काय मार्ग काढता येतील याचे भरपूर विचारमंथन करून या क्षेत्रातील दिग्गजांशी, तज्ज्ञांशी, बुध्दीवंतांशी व आज अधिकारी असलेल्या अनेकांशी चर्चा झाली. त्यातून सहजसोपा, घरबसल्या अभ्यास करून अभ्यासाची नवीन पध्दती विकसित करावयाची या निष्कर्षाप्रत संस्था आली. त्यानंतर परिश्रमाची पराकाष्टा करून तसेच जे दयायचे ते अत्युत्तमच दयायचे या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात अद्भुत क्रांती घडवण्यासाठी ध्रुव फाऊंडेशनने या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

ध्रुव फाऊंडेशनचे संशोधनात्मक कार्य

ध्रुव फाऊंडेशनचे डिजीटल अभ्यासक्रम व पब्लिकेशन्स ही सर्वात वेगळी संकल्पना विदयार्थ्यांमध्ये राबवत असून सतत प्रयोगशील राहून नवनिर्मिती करण्याकडे कल असून संस्थेकडे शैक्षणिक क्षेत्रातील कुशल, अनुभवी व सर्जनशील व्यक्ती विदयार्थ्यांचा बौध्दिक विकास, व्यक्तिमत्व विकास, गुणात्मक वाढ, भविष्यातील स्पर्धांना तोंड देण्यासाठी सज्ज होण्यासाठी पूर्वपिठिका तयार करणे इत्यादी बाबींसाठी सतत संशोधन करून त्यांना गतीशील करण्यासाठी ध्रुव फाऊंडेशनचे संशोधनात्मक कार्य सतत चालू आहे.