ध्रुव फाऊंडेशनने विदयार्थ्यांसाठी
संशोधित केलेली पध्दत

विदयार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक त्याच विषयातील तज्ञांकडून शिकविला जाईल. विदयार्थ्यांने कोणत्याही प्रकारचा ताण न घेता तो पाठ समजावून घ्यावा, त्यातून त्या पाठातील विचारल्या जाणा-या प्रश्नांची उत्तर अगदी सहजपणे मिळावीत. त्या त्या प्रकरणामधील सर्व संकल्पना विदयार्थ्याला सहजपणे समजाव्यात आणि त्यांच्या आत्मविशासात वाढ व्हावी असा या पध्दतीचा हेतू आहे. या पध्दतीमुळे चुकांची पुनरावृत्ती टाळली जाईल. चुकांचे प्रमाण कमी होऊन गुणात्मक दर्जाही वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो, आज क्लासेसच्या नावाखाली लाखो रूपये विदयार्थ्यांकडून घेतले जातात, पण शिकवण्याचा दर्जा काय आहे हे आपण लक्षात घेतो का? पुस्तकांची यादी विदयार्थ्यांच्या हातामध्ये दिली जाते. सेल्फ स्टडी करताना लागणारे सातत्य जर टिकवता आले नाही तर कालावधी वाढत जातो व वर्षानुवर्षे विदयार्थी त्याच अभ्यासात जखडून जातात. म्हणूनच या सर्वापासून वेगळे व विदयार्थ्यांना सर्व संकल्पना सहजपणे समजतील, ताण न घेता त्या सहजपणे आत्मसात करता येतील अशा प्रकारची परिपूर्ण Digital अभ्यासपध्दती उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ध्रुव फाऊंडेशनने केला आहे. आम्हाला खात्री आहे की, केवळ आत्मविश्वासच नव्हे तर ही शिक्षणपध्दता ग्रामीण भागातील गुणवत्ता असणा-या पण आर्थिक दृष्टया सक्षम नसणा-या विदयार्थ्यांना आपलीशी वाटेल व त्यांच्यात गुणात्मक दर्जा वाढविणारी ठरेल.

अभ्यासक्रमाचे स्वरुप

ध्रुव फाऊंडेशनने तयार केलेले Video Lectures  हे मोबाईलमधील मेमरी कार्डच्या तसेच  व पेन ड्राईव्ह च्या रूपामध्ये उपलब्ध आहेत. याखेरीज यामध्ये जोडल्या जाणाऱ्या विदयार्थ्यांना प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटकावर स्वतंत्र व परिपूर्ण मार्गदर्शन तज्ञांमार्फत होणार आहे. प्रत्येक घटकाची तयारी करून घेताना विदयार्थ्यांना प्रत्येक घटकावरील सर्व संकल्पना सहजपणे समजतील अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये या संकल्पना विदयार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटकाची विदयार्थ्यांना पुन्हा पुन्हा पाहून व ऐकून तयारी करता येईल. प्रत्येक विषयाची चालू घडामोडींची माहिती अपडेट मिळावी यासाठी दर आठवडयास विदयार्थ्यांच्या whatsapp अथवा email वर सर्व अदयावत घटनांविषयीची माहिती मिळणार.

प्रत्येक परिक्षेच्या आगोदर 10 सराव प्रश्नपत्रिकांचा संच याप्रमाणे तयारी करुन घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे एखादा सिनेमा पाहताना आपण कोणताही ताण न घेता तो सहजपणे पाहतो व आत्मसात करतो, व त्याविषयीची माहिती आपण इतरांना सहजपणे सांगू शकतो त्याचप्रमाणे video Lecture  मधून विदयार्थ्याला एखादा विषय कोणताही ताण किंवा कोणतेही दडपण न घेता सहजपणे समजावून घेता येईल.

या विषयीचे `डेमो लेक्चर्स` पाहण्यासाठी You tube वरील Dhruva Foundation या चॅनेलवर सर्च करा. आज हजारो विदयार्थी याचा लाभ घेत आहेत व आपले अनुभव व्यक्त करीत आहेत.

इतर प्रशिक्षण संस्था व ध्रुव फाऊंडेशन यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहे ?

ध्रुव फाऊंडेशनने शेकडो विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक व मानसिक अभिवृत्ती यांचा शास्त्रशुध्द अभ्यास करून वर दिलेले निष्कर्ष काढले व संशोधनातून नवीन अभ्यास पध्दती विकसित केली. इतर प्रशिक्षण संस्था ज्या लाखो रूपये शुल्क घेऊन व्यवसाय करतात, तिथे देखील विदयार्थी  चार ते पाच वर्षे रखडतात. ध्रुव फाऊंडेशन मात्र या विद्यार्थ्यांपर्यंत पोचून त्यांच्या शंका समाधानासाठी लेखी, फोनवरून अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून उत्तरे देऊन त्यांचे समाधान करते व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते हे 114 कॉलेजमधील हजारो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातून साध्य झाले आहे.

डिजीटल लेक्चर्सच्या माध्यमातून होणारी तयारी

  • विद्यार्थ्यांचा कल समजतो

  • आत्मविश्वास वाढतो

  • स्वत: प्रश्न तयार करण्याची सवय लागते

  • उत्तरे दीर्घकाळ स्मरणात राहतात

  • स्वत: प्रश्न तयार करताना काठिण्य पातळीचा दर्जा समजावून सांगितला जातो

  • पेपरमधील प्रत्येक घटकाचे नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण मिळते

  • वेळेत पेपर कसा सोडवावा याविषयी मार्गदर्शन मिळते

  • सर्व संकल्पना एकत्रितपणे अभ्यासता येतात यामुळे वेळेमध्ये बचत होते